|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा ट्रेव्हल मार्ट प्रदर्शनाचे उद्घाटन

गोवा ट्रेव्हल मार्ट प्रदर्शनाचे उद्घाटन 

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटान विकास महामंडळातर्फे तर्फे पणजी कोन्वशन सेंटरमध्ये आजपासून ट्रेव्हल ऍण्ड टुरिझमचे प्रदर्शन भरण्यात आले आहे. हे प्रशर्दन उद्या रविवार 16 जानेवारी पर्यंत खुले असणार आहे. सकाळी 11 ते सायं. 6 पर्यंत हे प्रेक्षकांसाठी खुले आहे. गोवा पर्यटन खात्याचे संचालन मिनिनो डिसोझा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

  ट्रेव्हल मार्ट या प्रदर्शनामध्ये पर्यटकांना त्यांच्या टूरविषयी विविध माहिती उपलब्ध होणार आहे. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने गोव्यात अनेक पर्यटक येत असतात. त्यांना या प्रदर्शनाचा लाभ होणार आहे. या प्रदर्शनामध्ये पर्यटकासाठी अनेक महिती उपलब्ध आहे. यामध्ये झारखंड, हिमाचल प्रदेश तसेच कर्नाटक या तीन राज्यातील विविध पर्यटनाविषयी माहिती आहे. या राज्याच्या पर्यटन खात्याची या ठिकाणी दालने आहेत. याचा फायदा पर्यटकांना होणार आहे. गोवा पर्यटन खाते गोव्यात येणाऱया पर्यटकांची योग्य प्रकारे काळजी घेत आहे.

गोवा हे पर्यटन क्षेत्र असल्याने या ठिकाणी देश विदेशातील पर्यटक येत असतात या ठिकाणी हिमाचल प्रदेशचा पर्यटनाविषयी माहिती पर्यटकांना मिळू शकते. त्यामुळे या प्रशर्दनामध्ये हिमाचल प्रदेशच्या पर्यटनाची माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. हिमाचल हा भौगोलिक मोठे राज्य आहे यात वारसा स्थळे देवदर्शनाची श्रद्धास्थळे आहे, असे यावेळी हिमाचल प्रदेशाच्या सुनैना शर्मा यांनी सांगितले. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी दिपक नार्वेकर व इतर उपस्थित होते.

Related posts: