|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बांगलादेशी घुसखोरी हा देशाला लागलेला मोठा कॅन्सर

बांगलादेशी घुसखोरी हा देशाला लागलेला मोठा कॅन्सर 

प्रतिनिधी/ म्हापस

भारत देश स्वातंत्र होण्यापूर्वी दळणवळण होती ती पूर्व पाकिस्तान मधून सुरू झाली. आज बांगलादेशाची घुसकोरी ही देशाला लागलेला मोठा कॅन्सर आहे. भारतात 32 टक्के लोक बांगलादेशी आहेत. हे थांबविणे आज काळाची गरज आहे. देशात असलेल्या बांगलादेशीयांकडे ओळखपत्र नाही. ज्यांच्याकडे आहेत ती सर्व बनावट आहेत. त्यांचे 99 टक्के पत्ते खोटे आहेत. आज भारताच्या सीमा भागात दहशतवादाचे धोके आहेत. काश्मिरमधील घुसकोरी जवळ संपलेली आहे. डाव्या बाजूला पाकिस्तानात 85 टक्के दहशतवादी सीमेवर मारले जातात. पाकिस्तान आहे तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही. निवडणुकीत भाग घेण्यासाठी येणाऱया लोकप्रतिनिधींना आता सांगण्याची वेळ आली आहे. देश द्रोहीचा प्रचार थांबवून आम्हाला भारत देशात शांततेत जगायला द्या, असे मत ब्रिगेडीयर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

   म्हापसा हनुमान नाटय़गृहात लोकमित्र मंडळ म्हापसातर्फे व कॉपरलिक पुरस्कृत दहाव्या व्याख्यानमालेत ते बोलत होते. भारताची अंतर्गत सुरक्षा, आव्हाने व उपाययोजना या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. यावेळी व्यासपीठावर लोकमित्र मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बर्वे, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, ऍड. संजय उसगावकर, कॉपर लिक हॉटेलचे मालक सचीन वीर उपस्थित होते.

  पुढे बोलताना ब्रिगेडीयर हेमंत महाराज म्हणाले की, गोवा हे समुद्र किनारी राज्य आहे. भारताचा कायदा आहे ते सीमेच्या आत बारा नोटीकल लाईफ मध्ये आहे. सागरी सुरक्षतेचे काम वेळोवेळी यंत्रणा करीत आहे. पण त्यामध्येही आम्हाला वेगवेगळी सुधारणा करावी लागणार आहे. आजवर समुद्र किनाऱयाचा वापर जास्त प्रमाणात गैरवापरासाठी झालेला आहे. मात्र आमच्या काळात त्याचा चांगला वापर होत आहे. सागरमालाचा 85 टक्के व्यवहार सागरातून होतो. जागतिक अर्थकारण कमी करणे ही आज काळाची गरज आहे.

  बांगलादेशी घुसकोरी गोव्यामध्येही आहे

1930 साली महात्मा गांधींनी हिंसा झाल्या त्यावेळी झालेल्या युद्धाची नुकसानभरपाई यायला पाहिजे. 1947 साली भारत व पाकिस्तानमध्ये युद्ध झाले. 1971 नंतर युद्ध झाली. पारंपरिक व कोराकोरम युद्ध झाली. काश्मिर 1980 पर्यंत शांत होते. चित्रपट काश्मिरमध्ये शुट केले जायचे. त्यानंतर तेथे दहशतवाद सुरू झाला. बांगलादेशी सुरक्षा, सीएए हा कायदा लोकसभेत, राज्यसभेत पास झाला अहे. बांगलादेशाची घुसकोरी गोव्यामध्येही आहे, असे ते महाजन म्हणाले.

   बेटांवर अन्य सैन्याचा भराव आवश्यक

  जम्मू काश्मिरचा भाग भारतीय पर्यंत पोहचला आहे. येथील काही भाग चिनकडे गेला. काश्मिर लोकसंख्या दीड कोटी आहे. आज जी काश्मिरमध्ये होती ती मध्यभागी काश्मिर खोऱयात आहे. तेथे 40 लाख लोकसंख्या आहे. भारताची समुद्र सीमा 7600 कि.मी. ची आहे. लक्षदीप व अंदबार निकोबार आयलंड आहे. पूर्वी राजकारण्यांना भीती वाटत होती. नक्षलवादी येणार येथे कस होणार, गोव्यात समुद्र किनारा आहे. पण भारताकडे नौदल मोठे जहाज आहे. अंदबार निकोबार येथे चार नौदल आहे. तेथे भराव करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.

   भारतीय देशाविरोधातच बोलतात

  काश्मिर मध्ये जे काय चालले आहे ते आमच्या भारतीय सैनिकांनी राखून ठेवले आहे. सर्जीकल स्ट्राईक झाले ते सर्जीकल होते की फौजीकल होत. यावर वाद निर्माण झाला. आज सुद्धा आम्ही बघीतले तर वेगवेगळय़ा देशामधून भारतीय विरोधात लेख लिहिले जातात. भारतीय टिव्हीवरही भारताच्या सैन्यांच्या विरोधात लिहिले जाते. भारतीय टिव्हीवाले भारताच्याच सैन्याविरोधात बोलण्याचा प्रयत्न करतात हे एक देशासमोर दुर्देव आहे, असे ते म्हणाले.

    तर त्यांना शिक्षा द्या

राफेलमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. आरोप सिद्ध झाले नाहीत तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण काहीजण प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आरोप करतात, असे ते म्हणाले.

मी देशासाठी काय केले यावर भर द्या

सर्वांना वाटते सर्व गोष्टी सरकारने कराव्या. पण मी देशासाठी काय करू शकतो यावर भर दिला पाहिजे. आम्ही देशासाठी खुप गोष्टी करू शकतो. या देशाला भवितव्य नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या देशाची प्रगती केंद्रीत केली पाहिजे. समर्थ देशभक्त नागरिक निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे, असे महाजन म्हणाले.

सीमेपलीकडून होणारी घुसकोरी थांबवायला आणि दहशतवादाचा खात्मा करायला या देशाला गरज आहे. 1962 च्या युद्धात 90 टक्के सैन्य लढले नाही. त्यामुळे भारताचा पराभव झाला याला कारणीभूत आमचे सरकार आहे, असे ब्रिगेडीय महाजन यांनी सांगितले.

देशभक्ती म्हणजे काय आहे. संशयास्पद ज्या हालचाली यावर लक्ष ठेवायला पाहिजे. आज टिव्हीवर हिंसाचाराच्या बातम्या प्रथम दिल्या जातात. वाईटमध्ये ज्या बातम्या होतात त्यावर भर दिला जातो, असे होऊ नये. हिंसाचाराच्या बातम्या आतमध्ये घ्या. जे देशात चांगले आहे ते दिले तर देशाला आम्ही हातभार लावू शकतो, असे ते म्हणाले.

चिनची आर्थिक कोंडी करू शकतो

चिनचा 70 ते 80 टक्के व्यापार भारताच्या जवळून जातो. चिन ची आर्थिक कोंडी आम्ही करू शकतो. चिनने भारतावर घुसकोरी केली आहे. भारताचा 144 नंबर होता ते करीत आज 74 वर आला आहे.

प्रारंभी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन अविनाश बेळेकर तर आभार अनिल साळगावकर यांनी मानले.

Related posts: