|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा डेअरी ज्येष्ठ लेखाधिकारी राधिका काळे निलंबित

गोवा डेअरी ज्येष्ठ लेखाधिकारी राधिका काळे निलंबित 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा सहकारी दुग्ध उत्पादन सहकारी संस्था, कुर्टी फोंडा या गोवा डेअरीमधील ज्येष्ठ लेखाधिकारी श्रीमती राधिका काळे यांना अखेर शुक्रवारी निलंबित करण्यात आले.

गोवा डेअरीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमती राधिका काळे यांच्यावर सुमारे 20 तक्रारींची नोंद गोवा डेअरीच्या प्रशासकांकडे झालेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली असता त्यात बरेच तथ्य सापडून आल्यानंतर शुक्रवारी सकाळी राधिका काळे यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला.

दरम्यान, गोवा डेअरीमधील 2015 साली झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराचे गुढ उकलण्यात गोवा डेअरीच्या वरिष्ठ अधिकाऱयांना यश आले असून या प्रकरणात सुमारे 10 कोटी रुपयांचा पर्दाफाश झालेला आहे. या संदर्भातील संपूर्ण तपशील हाती लागला नाही. तथापि, राज्य सरकारने विशेषतः सहकार खात्याने याची गंभीर नोंद घेतलेली आहे.

Related posts: