|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात दीड महिन्यात 1.64 कोटींचे ड्रग्ज जप्त

राज्यात दीड महिन्यात 1.64 कोटींचे ड्रग्ज जप्त 

प्रतिनिधी/ पणजी

एएनसीने (अंमलीपदार्थ विरोधी विभाग) गेल्या दीड महिन्यात पाच तक्रारींची नोंद केली असून तब्बल 1 कोटी 64 लाख 50 हजार किमंतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणी सहा संशयितांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये दोन देशी तर 4 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.

अमलीपदार्थ विरोधी विभागाने गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत ड्रग्ज विरोधात चांगल्यापैकी कारवाई केल्याचे दिसून येत आहे. 7 जानेवारी रोजी शिवोली येथे केलेल्या कारवाईत 75 लाख रुपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला होता. याप्रकरणी एका जर्मन नागरिकाला अटक केली होती. 17 जानेवारी रोजी एका नायजेरियन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून 4 लाखाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. 7 फेब्रुवारी रोजी तुर्किस्तानी नागरिकाला अटक करून त्याच्याकडून 71 लाख रुपये किमंतीचा ड्रग्ज जप्त केला होता. 9 फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेश येथील दोघा नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 9.5 लाखाचा चरस जप्त केला होता. अटक केलेले सर्व संशयित सध्या पोलीस कोठडीत असून एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शिवोलीत पाच लाखाचे ड्रग्ज जप्त

एएनसीने शिवोली येथे गुरुवारी रात्री उशिरा केलेल्या कारवाईत 5 लाख रुपये किमंतीचे ड्रग्ज जप्त करुन लोऊह अहमद (25) या लेबनन संशयितास आटक करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी तो पर्यटक म्हणून गोव्यात शिवोली येथील भाडय़ाच्या खोलीत राहत होता. गोव्यात येणाऱया विदेशी पर्यटकांशी संपर्क करून संशयित त्यांना ड्रग्जची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एएनसी पोलिसांनी सापळा रचून तो राहत असलेल्या खोलीवरच रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 100 एलएसडी पेपर जप्त केले आहेत.

 उपअधीक्षक महेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुदेश वेळीप, सिताकांत नायक, उपनिरीक्षक रोहन मडगावकर, अरूण देसाई, कॉन्स्टेबल संदेश वळवईकर, सुशांत पागी, निकेत नाईक, रुपेश खांडोळकर, कुष्टा गावस, आयआरबी महिला कॉन्स्टेबल करीष्मा गावकर यांनी ही कारवाई केली.

 

Related posts: