|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यातील जनगणनेस 16 एप्रिलपासून प्रारंभ

राज्यातील जनगणनेस 16 एप्रिलपासून प्रारंभ 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यात इ. स. 2021 च्या राष्ट्रीय जनगणना कार्याला प्रत्यक्षात दि. 16 एप्रिल रोजी सुरुवात होत असून ते 30 मे पर्यंत म्हणजे एकूण 45 दिवस ती चालेल. या दरम्यान, शीरगणती आणि गृहगणती करण्यात येणार आहे.

गोवा आगामी जनगणनेला सज्ज होत आहे मात्र ऐन सुट्टीच्या कालावधीत ही जनगणना सुरु होत आहे. उन्हाळी सुट्टी साधारणतः एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात सुरु होत आहे. 16 एप्रिलपासून जनगणनेस प्रारंभ होईल. दर 10 वर्षांनंतर होत असलेल्या या जनगणनेमध्ये आपले नाव व आपले घर, त्याचा क्रमांक समाविष्ट करुन घेणे हे आवश्यक बनले आहे. जनगणनेमध्ये नोंद हा एक महत्त्वाचा पुरावा भविष्यात ठरविला जाणार आहे.

जनगणनेसाठीची तयारी सचिवालयात सुरु झाली आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांच्या प्रशिक्षणाचे काम शुक्रवारी परिषदगृहात सुरु झाले. मुख्य सचिवांनी उद्घाटन केले. जनगणनेची संपूर्ण गोव्याची जबाबदारी पाहत असलेले वरिष्ठ अधिकारी पी.एस.रेड्डी हेही यावेळी उपस्थित होते. आज शनिवारी देखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जनगणनेत सरकारी कर्मचारी, निवडणुकीत बीएलओचे काम पाहाणाऱया अधिकाऱयांना तसेच काही शिक्षकांना देखील ही जबाबदारी दिली जाणार आहे. पाटो येथील जनगणना कार्यालय सध्या गजबजायला सुरु झाले आहे. 2011 च्या जनगणनेवेळी गोव्याची लोकसंख्या 14.5 लाख होती. यावेळी ती 17.5 लाखपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Related posts: