|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सिलिओ रिबेलो आज गोव्यात

पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सिलिओ रिबेलो आज गोव्यात 

प्रतिनिधी/ पणजी

पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सिलो रिबेलो दी सौझा हे आज शनिवारी दोन दिवसांच्या गोवा भेटीवर येत आहेत. यावेळी पाणी आणि निचरा व्यवस्थापना संदर्भात पोर्तुगाल व गोवा सरकार दरम्यान सामंजस्य करार होणार आहे. आज शनिवारी संध्याकाळी 5 वाजता ते गोव्यात दाखल होतील.

शनिवारी संध्याकाळी एका कार्यक्रमात हा सामंजस्य करार होणार आहे. गोव्यातील पाणीपुरवठा पद्धतीसाठी तांत्रिक सहकार्य पोर्तुगालकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला लाभणार आहे. त्यासाठी पोर्तुगालकडून सल्लागार सहकार्य मिळणार आहे. पोर्तुगालस्थित आग्वास दी पोर्तुगाल व गोवा सरकार दरम्यान करार केला जाणार आहे असे साबांखामंत्री पाऊसकर यांनी सांगितले.

इमेजिन पणजी आयोजित ‘अर्बन डिझाइन’ या परिसंवादाचे उद्घाटन सोझा यांच्याहस्ते होणार आहे. शनिवारी रात्री राजभवनवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भोजनाचे आयोजन केले आहे. सौझा हे यावेळी उपस्थिती लावतील. तसेच रविवारी ते जुने गोवे येथील चर्चला भेट देतील. त्यानंतर ते गोव्याचा निरोप घेतील.

Related posts: