|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक

बलात्कारप्रकरणी तरुणाला अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन खडेबाजार पोलिसांनी गणेशपूर येथील एका तरुणाला शुक्रवारी अटक केली आहे.

आदर्श नारायण भोसले (वय 20, रा. गणेशपूर) असे त्याचे नाव आहे. पोलीस निरीक्षक धीरज शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

Related posts: