|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » समाजवादी विचार यात्रेचे 20 रोजी बेळगावात आगमन

समाजवादी विचार यात्रेचे 20 रोजी बेळगावात आगमन 

बेळगाव/प्रतिनिधी

म. गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त भारतीय समाजवादी आंदोलनाच्या राष्ट्रीय नेत्यांनी 30 जानेवारी पासून समाजवादी विचार यात्रा सुरू केली आहे. दिल्ली येथून सुरू झालेली ही यात्रा देशभरात विविध ठिकाणी संचार करीत आहे. सदर यात्रेचे आगमन गुरूवार दि. 20 रोजी बेळगाव शहरात होणार आहे. अशी माहिती समाजवादी आंदोलनाचे कर्नाटक राज्य समन्वयक अरविंद दलवाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर यात्रा गोवा येथून 20 रोजी सकाळी 10 वा. बेळगावात प्रवेश करणार आहे. यानंतर टिळकवाडी येथील वीरसौध येथे जाऊन भेट देण्यात येणार आहे. त्यानंतर 11.30 वा. कुमार गंधर्व रंगमंदीर येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. या यात्रेदरम्यान समाजवादी नेते अरूणकुमार श्रीवास्तव, मेधा पाटकर, गणेश देवी, सुनिलम्, हरभजनसिंह सिद्दू, प्रा. राजकुमार जैन, बी. जे. पारीख आदींचेही आगमन होणार आहे. कुमार गंधर्व रंगमंदीर येथे या मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. याप्रसंगी 1942 च्या चलेजाव चळवळीत भाग घेतलेल्या पाच स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Related posts: