|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मारुती कारला अचानक आग

मारुती कारला अचानक आग 

वार्ताहर/ हुक्केरी

तालुक्यातील बेल्लद बागेवाडी-घटप्रभा रस्त्यावरुन जात असलेल्या मारुती कारला अचानक आग लागल्याने संपूर्ण कार खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

सदर कार चिकोडीचे चंद्रकांत हंदिगुंद यांची असून ते आपल्या कुटुंबासह गोकाकला जात हेते. मात्र बेल्लद बागेवाडी-घटप्रभा रस्त्यावर येताच अचानक शार्टसर्किटमुळे कारला आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच सर्वजण कारमधून उतरले, तितक्यात आग भडकली व कारने पेट घेतला. यावेळी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी हुक्केरी पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवानंद गुडगनट्टी यांनी भेट दिली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related posts: