|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोन वेगवेगळय़ा अपघातात तिघे जखमी

दोन वेगवेगळय़ा अपघातात तिघे जखमी 

प्रतिनिधी/ निपाणी

गवाण फाटय़ानजीक दोन वेगवेगळय़ा अपघातात तिघेजण जखमी झाले. या अपघातात वाहनांचे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाले. शुक्रवारी सकाळी 9.30 व 10 वाजता हे अपघात झाले. सुमित्रा तमन्ना पाटील (वय 55), तमन्ना पाटील (वय 58) व सौरभ विजय पाटील (वय दीड वर्षे रा. बेळगाव) अशी कारमधील जखमींची नावे आहेत. सकाळी 9.30 वाजता झालेल्या अपघातात कारने उसाच्या ट्रॉलीला धडक दिली. तर सकाळी 10 वाजता झालेल्या अपघातात कंटेनरने दुभाजकला जोराची धडक दिली. यात दुभाजकाचे व कंटेनरच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे.

या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी, कार (क्र. केए 22 झेड 1808) ही बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने सकाळी 9.30 वाजता जात होती. त्याचवेळेला ऊस भरुन ट्रक्टर (क्र. एमएच 09 सीजे 1585) हा करंबळी गडहिंग्लजहून शाहू कारखाना कागलकडे जात होता. कारचालकाचा ताबा सुटल्याने कारने ऊस ट्रॉलीला मागून जोराची धडक दिली. यात कारमधील सुमित्रा, तमन्ना व सौरभ तिघेजण जखमी झाले. या अपघातात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला.  जखमींना त्वरित रुग्णवाहिकेतून महात्मा गांधी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बेळगाव येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले.

दुसऱया अपघातात सकाळी 10 वाजता कंटेनर (क्र. युके 04 ए 9141) हा बेंगळूरहून गुजरातकडे चालला होता. तवंदी घाट उतरल्यानंतर गवाण फाटय़ानजीक आला असता समोरून जाणाऱया कारला वाचविण्यासाठी त्याने कंटेनर वळविल्याने दुभाजकाला जोराची धडक देत तिथेच थांबला. यात कंटेनर चालक अकबरखान (वय 25 रा. हरियाणा) हा किरकोळ जखमी झाला आहे.  

वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविली

कार, ऊस ट्रॉली महामार्गावरच राहिल्याने वाहतूक सुमारे तीन तास सेवा रस्त्यावरुन वळविण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पायोलीन कंपनीचे अधिकारी एम. आर. घाटगे तसेच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार अरबळ्ळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास शहर उपनिरीक्षक कुमार हडकर करीत आहेत.

 

Related posts: