|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » Top News » ‘या’ व्यक्तीमुळे पसरला ‘कोरोना’ व्हायरस

‘या’ व्यक्तीमुळे पसरला ‘कोरोना’ व्हायरस 

ऑनलाईन टीम / लंडन :

कोरोना विषाणू पसरविणाऱया व्यक्तीचा शोध अखेर लागला असून, त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यामुळेच कोरोना अनेक देशांमध्ये पोहचल्याचे सांगितले जाते.

स्टिव्ह वॉल्श (वय 53) असे कोरोना पसरविणाऱया व्यक्तीचे नाव आहे. स्टिव्ह यांच्या माध्यमातून कोरोना अनेक देशांत पसरल्याने त्यांना ‘सुपर स्प्रेडर’ असे म्हटले जात आहे.

स्टिव्ह वॉल्श यांचा ब्रिटनमध्ये कसून शोध घेतला जात होता. अखेर ते लंडनमधील एका रुग्णालयात सापडले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्यामुळेच कोरोना इतर देशात पसरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टिव्ह जानेवारीत ब्रिटनमधील गॅस अ‍नलिटिक्स कंपनी सर्वोमॅक्सच्या विक्री परिषदेला गेले होते. तिथेच त्यांना कोरोना व्हायरसची बाधा झाली. त्यानंतर सिंगापूरमधील एका परिषदेलाही ते गेले. या परिषदेहून मलेशियाला परतलेल्या एका व्यक्तीच्या शरीरात कोरोना विषाणू आढळला. याच मलेशियन व्यक्तीच्या संपर्कात आल्याने दक्षिण कोरियाच्या दोघांना कोरोनाची बाधा झाली.

परिषदेला उपस्थित राहिलेल्या आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाली. परिषद संपल्यानंतर स्टिव्ह पत्नीसोबत फ्रान्समध्ये सुट्टीवर गेले. त्याआधी त्यांच्या संपर्कात आलेल्या ब्रिटनमधल्या चार मित्रांना कोरोनाची बाधा झाली होती. फ्रान्समध्ये सुट्टी घालवत असताना स्टिव्ह त्यांच्यासोबत ब्रिटनमधलेच पाच जण होते. त्यांच्या शरीरातही कोरोनाच्या विषाणूने प्रवेश केला.

Related posts: