|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘एल्गार’ची सुनावणी मुंबईत घेण्यास न्यायालयाची परवानगी

‘एल्गार’ची सुनावणी मुंबईत घेण्यास न्यायालयाची परवानगी 

 पुणे / वार्ताहर :

एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी मुंबई उच्च न्यायालय येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्यास पुण्यातील विशेष न्यायालय एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी यापुढे मुंबईत होणार आहे.

आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल 28 फेब्रुवारीला मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पुणे पोलिसांनी संबंधित प्रकरण एनआयएकडे हस्तांतरित करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. केंद्र सरकारने या घटनेचा तपास एनआयए यापुढे करेल, असे सांगितले आहे. राज्य सरकारने त्याला कोणतीही हरकत घेतली नसल्याने याप्रकरणात न्यायालय काही करू शकत नाही, असे सांगत हा तपास मुंबईला एनआयए न्यायालयात चालेल, असे स्पष्ट केले आहे.

पुणे न्यायालयात हे प्रकरण मुंबई एनआयए न्यायालयात हलविण्याबाबत अधिकार आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित होतो. परंतु, कलम 404 नुसार हा निर्णय देण्यात येत असल्याचे न्यायालयाने सांगितले. एनआयए कलम 22 नुसार राज्याला तपासाचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. तर कलम 11 मध्ये याबाबतचे अधिकार केंद्राला आहेत. एनआयएकडे तपास गेल्याने त्याची सुनावणी घेण्यासाठी पुण्यातदेखील न्यायालय आहे. याबाबत देण्यात आलेले विविध निकालाचे संदर्भ या प्रकरणात लागू होत नाही, असे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले होते. तर एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देण्याचे अधिकार सध्या सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.

Related posts: