|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » व्हॅलेंटाईन डे : पुण्यात सव्वा कोटी गुलाबफुलांची उलाढाल

व्हॅलेंटाईन डे : पुण्यात सव्वा कोटी गुलाबफुलांची उलाढाल 

 पुणे / प्रतिनिधी :

व्हॅलेंटाईनदिनानिमित्त पुण्यातील बाजारात गेल्या चार दिवसांत गुलाबाची तब्बल सुमारे सव्वा कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.

व्हॅलेंटाईनदिन आणि त्यापूर्वी आयोजित केल्या जाणाऱया विविध डेच्या कालावधीत गुलाबाच्या मागणीत वाढ होत असते. यावषीही गुलाबाला चांगली मागणी होती. परंतु, खराब हवामानामुळे गुलाबाच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्यामुळे गुलाबाच्या भावांत गेल्या वषीच्या तुलनेत वाढ झाली होती. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फुल बाजारात गुलाबाची गेल्या चार दिवसांत आवक दुप्पट झाली होती. फुल बाजारात साधारणपणे प्रतिदिन तीन हजार ते साडे तीन हजार गड्डी इतकी आवक गुलाबाची होते. प्रत्येक गड्डीत वीस गुलाब असतात. चार दिवसांपूर्वी गुलाबाची आवक दुप्पट झाली होती. सलग दोन दिवस आवक तेवढीच राहिली. गुरुवारी ही आवक आठ हजार गड्डीपर्यंत पोचली, तर शुक्रवारी आकडा साधारणपणे दहा हजार गड्डीपर्यंत पोहोचला, अशी माहिती बाजार समितीच्या प्रशासनाने दिली. प्रति गड्डीला सरासरी दोनशे रुपये इतका भाव मिळाल्याचेही प्रशासनाने नमूद केले.

गुलाब उत्पादक आणि निर्यातदार व्ही. एस. जम्मा म्हणाले, यावषी खराब हवामानाचा फटका उत्पादनाला बसला आहे. यावषी हिवाळय़ाच्या कालावधीत तापमान हे दहा अंश सेल्सिअसच्या खाली तीन ते चारच दिवस गेले होते. तापमान वाढल्याने गुलाबाचा हंगाम या वेळी लवकर सुरू झाला. जानेवारी महिन्यात 23 तारखेपासूनच गुलाबाची निर्यात सुरू झाली. ही निर्यात साधारणपणे 28 जानेवारीनंतर सुरू होत असते. निर्यातदारांकडूनही चांगली मागणी होती. यावषी निर्यात चांगली झाली असली, तरी खराब हवामानामुळे उत्पादनावर परीणाम झाल्याने तुलनेत निर्यात कमी झाली असावी.

Related posts: