|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Agriculture » राजाराम साखर कारखान्याचे 1415 सभासद अपात्र

राजाराम साखर कारखान्याचे 1415 सभासद अपात्र 

कोल्हापूर / प्रतिनिधी

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे 1415 सभासद अपात्र ठरविण्यात आले. प्रादेशिक साखर सहसंचालक अरुण काकडे आणि शनिवारी हा निकाल दिला. एकूण 1899 मधील 484 सभासदांना पात्र तर 1415 अपात्र ठरवण्यात आले आहे. अपात्र ठरवण्यात आलेले 709 सभासद यलूर मधील आहेत.

प्रादेशिक साखर सहसंचालकाच्या या निर्णयामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक गटाला जबर धक्का बसला आहे. कसबा बावडा येथील सभासदांनी कार्यक्षेत्र 1899 सभासदांना अपात्र ठरवण्यात यावे अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. याबाबत सुनावणी घेऊन 15 फेब्रुवारी पर्यंत निर्णय देण्यात यावा असे आदेश न्यायालयाने साखर सहसंचालकांना दिले होते.

Related posts: