|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन : इंदुरीकर

वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन : इंदुरीकर 

 ऑनलाईन टीम / संगमनेर :

कीर्तनात मी सांगितलेला पुत्रप्राप्तीचा फॉर्म्युला ज्ञानेश्वरीतील आहे. तरी देखील काही लोक मला विनाकारण टार्गेट करत आहेत. मागील चार दिवसात यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. आता माझी सहनशक्ती संपली असून, वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करेन, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पुत्रप्राप्तीच्या फॉर्म्युल्यावरुन वादाच्या भोवऱयात अडकलेल्या इंदुरीकर महाराजांनी दिली आहे.

‘सम तारखेला स्त्री  संग केल्यास मुलगा होतो तर विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते.’ या कीर्तनातील वक्तव्याने इंदुरीकर मागील चार दिवस ट्रोल होत आहेत.

त्याविषयी बोलताना इंदुरीकर म्हणाले, दोन-अडीच तासाच्या कीर्तनात एखादे वाक्य चुकीचे जाऊ शकते. पण मी बोललेलो वाक्य चुकीचे नाही. ते ज्ञानेश्वरीतील वाक्य आहे. तरीही काही लोक विनाकारण माझ्या मागे लागले आहेत. मी कशात सापडेना म्हणून मला गुंतवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील चार दिवस प्रचंड मनस्ताप झाला. आता आपली कॅपॅसिटी संपली. तीन दिवसात अर्धा किलो वजन कमी झाले. चार दिवसात हा वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करण्याचा निर्णय मी घेतला आहे.

 

 

Related posts: