|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसच्या स्फोटात दोघे जखमी

कोल्हापूर : कसबा सांगावमध्ये घरगुती गॅसच्या स्फोटात दोघे जखमी 

वार्ताहर/कसबा सांगाव

कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे घरगुती गॅसला अचानक लागलेल्या आगीमुळे स्फोट झाला. यामध्ये अब्दुल बकक्ष नदाफ (वय ५५) व त्यांचा नातू तैजब () हे दोघे जखमी झाले. आज, शनिवार (दि.15) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहाणी झाली नाही.

ग्रामपंचायत जवळील मुल्ला मोहल्यात असणार्‍या अब्दुल नदाफ यांच्या घरी हा स्फोट झाला. गॅस सुरू असताना अचानक हा स्फोट झाला. या आगीत दुसर्‍या मजल्यावर झोपलेल्या तैजबला या आगीची झळ बसून तो जखमी झाला. तर पेटलेला गॅस सिलिंडर बाहेर काढत असताना अब्दुल नदाफ जखमी झाले. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

Related posts: