|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मानिनी जत्रेत ज्युनिअर जॉनी लिव्हरची धमाल

मानिनी जत्रेत ज्युनिअर जॉनी लिव्हरची धमाल 

प्रतिनिधी/सातारा

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद यांच्यामार्फत जिल्हा परिषद मैदानावर आयोजित केलेल्या मानिनी जत्रेमध्ये मनोरंजनात्मक कार्यक्रमांची बहार फुलली आहे. रोज संध्याकाळी सात ते साडे नऊ या वेळेत मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी दिली जात आहे. त्याअंतर्गत ज्युनिअर जॉनी लिव्हर यांनी हास्यसम्राट हा कार्यक्रम सादर केला आणि रसिकांची मने जिंकली.

ज्युनिअर जॉनी लिव्हर यांनी कार्यक्रम रंगतदार करत विविध कला सादर केल्या. विविध सामाजिक कौटुंबिक किस्से सांगितले. त्यांची सांगण्याची पद्धत देहबोली आणि अनुभव यामुळे रसिक हास्यकल्लोळात बुडाले. जीवनातील छोटेछोटे विसंगतींवर बोट ठेवत जॉनी लिव्हर यांनी विनोदी किस्से रंगवले. उपस्थित सर्व नागरिक, अधिकारी, कर्मचारी, जत्रेला भेट देणारी रसिक या सर्वांनीच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

Related posts: