|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » बांबूकडे औद्योगिक उत्पादन म्हणून पाहण्याची गरज

बांबूकडे औद्योगिक उत्पादन म्हणून पाहण्याची गरज 

ऑनलाईन टीम / पुणे :  

 महाराष्ट्रामध्ये केरळच्या बरोबरीने बांबूचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील कोकण आणि विदर्भ पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर बांबूचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या उत्पादनाकडे आपण औद्योगिक उत्पादन म्हणून पाहिले जात नाही. तसे झाल्यास या पर्यावरणपूरक उत्पादनाव्दारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. बांबूकडे औद्योगिक उत्पादन म्हणून पाहण्याची गरज आहे, असे मत बांबूचे संशोधक आणि अभ्यासक आणि बांबू सोसायटी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र चाप्टरचे कार्यकारी संचालक हेमंत बेडेकर यांनी व्यक्त केले. 
बांबू सोसायटी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र चॅप्टर,पुणे जिल्हा बुरूड समाज, पुणे विद्यापीठ, बांबू डेवल्पमेंट बोर्ड आणि बांबू फाैऊडेशन यांच्यासंयुक्त विद्यमाने पुण्यात पहिल्यांदाच गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित ‘पुणे बांबू फेस्टिव्हल २०२०’चे उद्घाटन आज या प्रदर्शनाला प्रथम भेट देणा-या व्यक्तीच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना हेमंत बेडेकर बोलत होते. 
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, नचिकेत ठाकूर, धनश्री बेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 46 बांबू उत्पादक सहभागी झाले असून यामध्ये बांबूचे फर्निचर, बांबूची सायकल, लँप्स, शोभेच्या वस्तू पहायला मिळणार आहेत. 

Related posts: