|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन

ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

गेली 60 वर्षे नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी आदी क्षेत्रांत अभिनय क्षेत्र गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निधन झालं. मुंबईतील राहत्या त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हिंदमाता येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, ‘लोकनाटय़ाचा राजा’ असा किताब मिळालेल्या राजा मयेकर यांची आंधळं दळतंय, यमराज्यात एक रात्र, असूनी खास घरचा मालक, बापाचा बाप, नशीब फुटकं सांधून घ्या, कोयना स्वयंवर या नाटकांना तुफान प्रतिसाद मिळाला आहे.

 

Related posts: