|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » इंदुरीकर महाराजांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱयांविरोधात गुन्हा

इंदुरीकर महाराजांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱयांविरोधात गुन्हा 

 ऑनलाईन टीम / नगर :

हभप. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या कीर्तनाची बदनामी करणारे व्हिडिओ सोशल मीडिया आणि युटय़ूबर पोस्ट करणाऱयांविरोधात पुणे सायबर शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदुरीकर यांचे वकील पांडुरंग शिवलीकर यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती. ‘सम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगा होतो तर विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते.’ या कीर्तनातील वक्तव्याने इंदुरीकर महाराज मागील तीन दिवसांपासून ट्रोल होत आहेत.

या कीर्तनाचा काही भाग सोशल मीडिया आणि युटय़ूबवर पोस्ट करण्यात आला आहे. यामधून इंदुरीकर महाराजांची बदनामी झाल्याचा ठपका ठेवत मराठी तडका, मराठी मीडिया, चिवडे, अमर आवटे आणि माझा महाराष्ट्रशी संबंधितांवर भादंविच्या कलम 500 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कीर्तनातील पुत्रप्राप्तीबाबतचा फॉर्म्युला ज्ञानेश्वरीतील आहे. तो बरोबरच आहे. त्यामुळे माझे चुकलेले नाही. तरीदेखील माझी विनाकारण बदनामी करण्यात येत आहे. मागील चार दिवस प्रचंड मनस्ताप झाला. आता आपली कॅपॅसिटी संपली. हा वाद थांबला नाही तर कीर्तन सोडून शेती करण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.

Related posts: