|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » solapur » वैराग मधील पाचजण तडीपार

वैराग मधील पाचजण तडीपार 

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग

वैराग मधील पाच जणांना सोलापूर शहर सोडून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून अठरा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबत माहिती वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली .

याबाबत माहिती अशी, वैराग पोलिसात शरीर विषयक, मारामारी, बेकायदेशीर जमाव जमवून भांडण करणे असे गुन्हे दाखल असलेल्या अक्षय विलास अंधारे, आदिनाथ संतनाथ खेंदाड, प्रवीण संतनाथ खेंदाड, कादर युनूस उर्फ रसूल शेख, दिपक सुभाष माने सर्वजण रा .वैराग यांनी सोलापूर शहर वगळून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून आठरा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ .सिध्देश्वर भोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलीस हवालदार सिध्देश्वर गोटे, पोलीस शिपाई अजय बुरले, शिवाजी मुंढे, महिला पोलीस ज्योती जाधव यांनी केली.
विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात वैराग पोलिसांनी आठरा जणांवर तडीपारीची कार्यवाही केली आहे.

Related posts: