|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » शेतकऱयांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणार : उद्धव ठाकरे

शेतकऱयांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढणार : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / जळगाव : 

कर्जाच्या विळख्यातून शेतकऱयाला कायमचं बाहेर काढणं हे आमचं लक्ष असून हे सरकार निश्चितच शेतकऱयाला कर्जमुक्ती देईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बळीराजाला दिले आहे.

जळगाव मधील मुक्ताईनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱयांनो, काळजी करू नका, आता राज्यात तुमचे सरकार आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला काहीही काळजी करण्याचे कारण नाही. कर्जमुक्तीवरही मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला हमी दिली. कर्जमुक्तीची सुरुवात पुढील महिन्यात होईल. कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे.

 

Related posts: