|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » आझम खान पत्नी व मुलासह कोर्टात शरण

आझम खान पत्नी व मुलासह कोर्टात शरण 

2 मार्चपर्यंत तुरुंगात रवानगी 

ऑनलाईन टीम / रामपूर  :  

समाजवादी पार्टीचे खासदार आझम खान बुधवारी पत्नी तंजीन फातिमा व मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील रामपूरच्या विशेष कोर्टात शरण आले. त्यानंतर कोर्टाने या तिघांनाही दोन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आझम खान दोन जन्माचे दाखले बनवण्यासह इतर प्रकरणांमधील आरोपांबाबत कोर्टात हजर झाले.

दरम्यान, सन 2017 मध्ये उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आझम खान आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक खटले दाखल करण्यात आले होते. यापैकी अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, कोर्टाच्या या आदेशांकडे आझम खान यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केले. दरम्यान, त्यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, इथेही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

मात्र आज, आझम खान आपल्या कुटुंबियांसह कोर्टासमोर शरण आले आहेत. आजच्या झालेल्या सुनावणीत कोर्टाने या तिघांनाही 2 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

Related posts: