|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » बावधन बगाड उत्साहात; यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल होणार

बावधन बगाड उत्साहात; यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल होणार 

प्रतिनिधी / सातारा

राज्यातून बावधनच्या बगाडाला लाखो भक्त येतात. शेकडो वर्षापासून असलेल्या पारंपारिक यात्रेला यावर्षीं मात्र प्रशासनाकडून यात्रा भरवू नका, असे यात्रेच्या आदल्या दिवशी सुचित केले होते. मात्र, यात्रेकरता तब्बल एक महिना अगोदरपासून बावधन ग्रामस्थ व परिसरातील नागरिक झटत असतात. होळीच्या दिवशी बगाडय़ा ठरतो. काशिनाथाच्या नावाने सकाळीच बगाड मिरवणूकीला सुरुवात झाली होती. लाखो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा उत्साहात पार पडली असली तरीही यावर्षी एवढी गर्दी दिसत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, मुंबई, पुणे येथून येणारे भाविकही यात्रेकरता आले नाहीत.

बावधन यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल होणार

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांना आमची ना नाही. परंतु गर्दी होवू नये. कोरोनाच्या अनुषंगाने यात्रा, जत्रावर कडक निर्णय घेण्यात आला आहे. बावधन यात्रेच्या अनुषंगाने आम्ही यात्रा कमिटीला विनंती केली होती. त्यांच्यावरही मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करणार आहोत. यापुढे यात्रा, जत्रा, लग्न सोहळा साजरा करायचा असेल तर प्रशासनाची एनओसी घ्यावी लागेल, असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले जान है तो जहान है, आपली काळजी आपण घेतली तरच सर्व काही आपण करु शकू. जो कोणी नियम पाळणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: