|Saturday, March 28, 2020
You are here: Home » leadingnews » महाराष्ट्रात 63 कोरोनाग्रस्त

महाराष्ट्रात 63 कोरोनाग्रस्त 

 ऑनलाईन टीम / पुणे :

मुंबईत कोरोनाचे 10 तर पुण्यात एक रुग्ण नव्याने आढळून आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 63 वर पोहचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत टोपे बोलत होते. टोपे म्हणाले, परदेशवारी करुन मुंबईत आलेल्या 8 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर संसर्गातून तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नव्याने आढळलेल्या 11 रुग्णांपैकी 10 जण मुंबईत तर एक जण पुण्यातील आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 63 वर पोहचली आहे.

राज्यातील 63 कोरोनाग्रस्तांपैकी 12 ते 14 जणांना केवळ संसर्गातून कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, संपर्क टाळून कोरोनाचा सामना करावा. रेल्वे स्थानकांमधील गर्दी प्रवाशांनी कमी करावी. गर्दी कमी न झाल्यास मुंबईतील लोकल सेवा बंद करावी लागेल, असेही टोपे यांनी सांगितले.

Related posts: