|Saturday, March 28, 2020
You are here: Home » संवाद » गुढी पाडवा अभ्यास वाढवा

गुढी पाडवा अभ्यास वाढवा 

‘गुढी पाडवा अभ्यास वाढवा’ असे आपल्याकडे लहान मुलांना मस्करीने म्हटले जाते. कारण मार्च – एप्रिल महिना म्हणजे शालेय मुलांच्या परीक्षेचे दिवस.  त्यामुळे जोमाने अभ्यासाला लागण्याची हीच ती वेळ, असा नकळत संदेश त्यात असतो.  आपल्या भारतीय पंचांगानुसार आपले नवीन वर्ष या दिवसापासून सुरु होते. म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. या सणाला अनेक नावाने संबोधिले जाते. गुढी पाडवा, पाडवो, पड्डावो, युगादी, उगादी, संसर पडवो, चेटी चाँद, नवरेह, सेजायुग, नाम्ना पानब.

आपल्याकडे मानल्या जाणाऱया साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक मुहूर्त. गुढी पाडव्याचे दाखले अगदी  त्रेतायुगापासून, द्वापारयुगापासून आपल्याला मिळतात. प्रभू रामचंद्र जेव्हा 14 वर्षाचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून  अयोध्येत परत आले, त्या दिवशी अयोध्येतील प्रजेने दारात प्रभू रामांच्या स्वागतासाठी  सडा – रांगोळी घालून, गुढय़ा उभ्या केल्या. तोच हा दिवस. म्हणजे कितीतरी हजारो वर्षाची परंपरा लाभलेला हा दिवस. पुढे आपल्या संस्कृतीला धुळीत मिळवण्याच्या हेतूने अनेक परकीय सत्ता आपल्या देशात आल्या. सर्वत्र अराजकतेचे सावट असताना एक युगपुरुष जन्माला आला, ज्याने कोलमडलेल्या  हिंदू संस्कृतीला नव्याने  स्वराज्याचे बाळकडू  दिले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुन्हा गुढी उभी करण्याची संकल्पना प्रत्यक्ष शिवरायांची होती आणि आजतागायत  ही मानाची गुढी कित्येक भारतीयांच्या घरी अगदी दिमाखात उभारली जाते.

चैत्र महिन्याचे हे दिवस म्हणजे झाडांना नवीन पालवी फुटण्याचे दिवस. नव्या अंकुराने नव्याने सृष्टी सजण्याचे दिवस. आपल्या निसर्गदेवतेकडून आपण मानवानीही काही बोध घ्यायला हवा. गुढीच्या काठीला ज्याप्रमाणे कडुलिंबाच्या पानाच्या डहाळय़ा आणि साखरेची माळ दोन्ही लावली जाते त्याप्रमाणे आपण आपल्या आयुष्यातही जुन्या कडू आठवणी, अनुभवांना तिलांजली देत नव्या गोड आठवणींना वाट करून देणारे नवीन बीज पेरायला हवे आणि याची सुरुवात प्रत्येक कुटुंबापासून झाली पाहिजे. कारण आपल्या भारतीय कुटुंब पद्धतीचा पायाच जणू शुद्ध,  निर्मळ नातं आहे. पण  एकूणच बदलत्या काळानुसार आजकालच्या विवाहित जोडप्यांचे गणितही बदलले आहे. आत्मकेंद्रित असणाऱया ह्या पिढीच्या बुद्धीवर आपल्या नको तितक्मया शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमतेचा  जणू पडदाचं पडलाय. त्यामुळे दिवसेंदिवस नात्यांची गाठ सैल होत असताना दिसत आहे. बऱयाच घरात नवरा – बायको, भाऊ – भाऊ, भाऊ – बहीण, बहिणी – बहिणी दुर्दैवाने कधी कधी स्वतःच्या आईवडिलांबरोबरही बऱयाच मुलांचे नाते काही क्षुल्लक कारणावरून तुटताना  दिसत आहे. हे सर्व थांबवायचे असल्यास काय हवंय ?अभ्यास हवाय!

आता लहान बाळाचंच घ्या ना, जेव्हा ते चालायला लागते तेव्हा ते कित्येकदा पडते, पण पडते म्हणून थांबत नाही, पुन्हा नव्याने उठते आणि नव्याने प्रयत्नाला लागते. त्याने तो पडणे -उठणे याचा अभ्यास केला म्हणून तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यातही असाच अभ्यास हवा. मग ते बालपण असो वा शालेय जीवन…, करियरसाठीची धडपड असो वा लग्नासाठीचे संशोधन अथवा नात्यातील उतार चढाव… प्रत्येक पावलावर अभ्यास हा हवाच. पण हा अभ्यास करत असताना भूतकाळातील वाईट अनुभवांना तिलांजली देत, चांगल्या आठवणींवर मननचिंतन व्हायला हवे. भूतकाळातील अनुभव कधीच वाया जात नाहीत. ते वाईट असले तरीही नीट विचार केला असता त्यातून आपल्याला वर्तमान आणि भविष्यासाठी नक्कीच बोध मिळतो. त्यामुळे अभ्यास हा हवाच.

आता हा अभ्यास कसला तर स्वतःला समजून घेण्याचा. अभ्यास आपल्या प्रियजनांना समजून घेण्याचा. अभ्यास समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा. प्रत्येक माणूस वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाची आयुष्याला समजून घेण्याची कलाही वेगळी आहे त्यामुळे विचारांचे हे युद्ध वैचारिक पातळी ओलांडून भावनिक गुंता वाढवणार नाही याचा अभ्यास व्हायला हवा. असं म्हणतात की पाडव्याच्या दिवशी एखादी नवीन गोष्ट घरात विकत घेतली पाहिजे  जसं की सोने, चांदी  किंवा नवीन घरात गृहप्रवेश किंवा आणखी काही मौल्यवान वस्तू . कारण त्याने घरात समृद्धी येते, भरभराट  येते, संपन्नता येते आणि ती वस्तू निरंतर, चिरकाल आयुष्यात टिकून राहते. ह्या झाल्या सगळय़ा व्यावहारिकपणाच्या गोष्टी. पण  घराला घरपण आणायचं असल्यास घरात प्रेम वृद्धिंगत व्हायला हवं. आपापसात जिव्हाळा वाढायला हवा. त्यासाठी एकमेकांना समजून घेण्याचा अभ्यास वाढवायला हवा. त्यामुळे ‘गुढी पाडवा – अभ्यास वाढवा’ ही उक्ती  फक्त शालेय मुलांनाच नाही तर आपल्या सर्वानाच लागू पडते.

चला तर मग या गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपल्यातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, विश्वास, सेवाभावी वृत्ती, भक्ती, नि÷ा, समर्पण या सगळय़ाचीच वृद्धी होण्यासाठी एक पाऊल पुढे उचलुया आणि खऱया अर्थाने समृद्धतेची ही गुढी फक्त पाडव्या दिवशीच नव्हे तर आयुष्यभर आपल्या मनामनात अखंड स्थित करूया.

– डॉ. स्नेहल अवधूत सुखठणकर

Related posts: