|Saturday, March 28, 2020
You are here: Home » संवाद » आता जबाबदारी वाढली…

आता जबाबदारी वाढली… 

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा झाल्यानंतर अनेकांना मनस्वी समाधान वाटलं. मात्र या समाधानावर थांबता कामा नये. या विषयाचे काही पैलू समजून घेतले पाहिजेत. कालौघात महिला निर्भिड झाल्या आहेत. आपली माध्यमं, समाजमाध्यमं याला कारणीभूत आहेत. शिक्षणाच्या प्रसारामुळेही महिला बोलू लागल्या आहेत. आज बलात्काराच्या बर्याच घटना उघडकीस येत आहे. महिला तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत. भारतातल्याच नाहीत तर जगभरातल्या घटना समोर येत आहेत. हॉलिवूडमध्ये ‘मी टू’ मोहिमेची सुरूवात झाली. हॉलिवूडमधल्या नटय़ांनी तिथल्याच एका निर्मात्यावर ‘मी टू’ अंतर्गत आरोप केले. त्याची कुकर्मं बाहेर काढली. यशाच्या शिखरावर असणार्या, जगातल्या दहा श्रीमंतांमध्ये गणना होणार्या माणसावर बोट उगारण्याची ताकद येण्यासाठी त्रीत्व सबळ झालं आहे.

आजच्या त्रिया सबळ आहेत. पण असं असूनही विवाहांतर्गत बलात्कार होतात, लहान मुलींवर अत्याचार होतात, म्हातार्या बायकांवर होतात, वैद्यकीय  शिक्षणसंस्था, मीडिया हाउस, कॉर्पोरेट जगत, कायद्याचं घर, हॉलिवूड, बॉलिवूड अशा प्रत्येक ठिकाणी महिलांवर अत्याचार आणि बलात्कार होत असतात. हे सगळं थांबवायचं असेल तर  समाजमनाने सजग व्हायला हवं आणि मुख्य म्हणजे त्रियांनी बोलकं व्हायला हवं. निर्भिड व्हायला हवं. सर्व त्रियांमध्ये एकी असायला हवी. एखाद्या पीडित महिलेला नावं ठेवण्यापेक्षा तिला समर्थ साथ द्यायला हवी, तिच्या सोबत उभं रहायला हवं.

पुरुष हा त्रीचा शत्रू आहे, असंही मी म्हणणार नाही. मी या मानसिकतेची नाही. अनेक वेळा त्रीही स्वतःची शत्रू असते. सगळ्या चुकीचं माप पुरुषांच्या पारडय़ात टाकणारी त्रीवादी मी नाही. बायकांचं चुकतच नाही असंही मी म्हणणार नाही. मी जर संस्कारांचं वत्र प्रत्येक वेळी उतरवून ठेवायला लागले तर चूक फक्त समोरच्याची आहे असं म्हणणं गैरच आहे. राग आल्यावर अपशब्द उच्चारायला कोणाला आवडणार नाही? पण त्रयस्थांपुढे आपण अपशब्द उच्चारणार नाही. हा भाषेचा, घरचा संस्कार झाला. त्याच पद्धतीने त्रियांनी वत्रांच्या बाबतीतला विधीनिषेध पाळायला हवा. ‘सो व्हॉट, आय हॅव अ बॉडी अँड आय विल फ्लाँट इट’ ही मला विचित्र मानसिकता वाटते.

Related posts: