|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » करफ्यूच्या दुसऱया दिवशी जनतेचा सुक्य़ा माशांच्या आमटीवर ताव

करफ्यूच्या दुसऱया दिवशी जनतेचा सुक्य़ा माशांच्या आमटीवर ताव 

प्रतिनिधी/ म्हापसा

राज्यात लागू केलेल्या जनता करफ्यूमुळे दुसऱयादिवशीही जनतेने घरी बसणे पसंत केले. मासे नसल्याने काहींनी सुके मासेची अमटी करणे पसंत केले तर काहींनी ऑम्लेट व अंडय़ाची आमटी करून कसाबसा दुसरा]िदवस घालविला. सोमवार हा शाकाहारी दिवस असल्याने जास्ततः लोकांनी डाळ-भात भाजीवर आपला ताव मारला.

विशेषतः युवा वर्गांनी घरात बसून पॅरम, बुद्धीबळ, पत्ते खेळण्याकडे आपला दिवस घालविला. तर काहींनी टिव्ही पाहण्यात आपला दिवस काढला. दरम्यान याबाबत माहिती देताना काणका येथील प्रथमेश कोनाडकर म्हणाले की, कोरोनाच्या निमित्ताने आम्हाला निदान घरी तरी बसण्यास वेळ मिळाला. एरवी या ना त्या कामानिमित्त आम्ही घराबाहेर असायचो. आज सोमवारी आम्ही सर्वांनी घरी बसून एकत्रित जेवण केले असे ते म्हणाले.

अनिलकुमार नागवेकर म्हणाले की, एरव्ही सुट्टी असूनही आम्ही एकत्रित घरी मिळत नव्हतो मात्र जनता करफ्यू असल्याने आम्ही सर्वांनी मिळून एकत्रित कुटुंबियांसमवेत जेवण केल्याचे ते म्हणाले. पारंपरिक पद्धतीने सुकी कोळंबी घालून आमटी केल्याचे त्यांनी सांगितले. सोनारवाडा येथील समाजसेवक दत्ताराम पेडणेकर म्हणाले की, आम्ही सोमवारचा दिवस पाहून करफ्यूमुळे डाळ-भात केला विशेष म्हणजे आपल्या मुली जमात नातवंडे सर्वजण सुट्टीमुळे घरी आले आणि एकत्रित दुपारचे जेवण केले. करफ्यूचे निमित्त का असेना यामुळे खूप दिवसांनी कुटुंबीयांसमवेत एकत्रित भोजन करण्याची संधी मिळाली हे मात्र खरे असे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

Related posts: