|Saturday, March 28, 2020
You are here: Home » उद्योग » जगातील श्रीमंताच्या यादीमधून मुकेश अंबानी बाहेर

जगातील श्रीमंताच्या यादीमधून मुकेश अंबानी बाहेर 

कोरोनामुळे मोठा फटका बसल्याचे अंदाज

वृत्तसंस्था/ मुंबई

कोरोनाच्या वाढत्या धास्तीचा फटका देशातील सर्वांना बसत आहे. यात आर्थिक क्षेत्रात अधिक संबंध असल्याची माहिती आहे. देशातील सर्वात श्रीमंत म्हणून मुकेश अंबानी यांची नोंद आहे. यासोबतच त्यांची जगातील श्रीमंताच्या प्रमुख यादीमधून बाहेर गेल्याची ब्लूमबर्ग यांच्या अहवालातून सदरची माहिती देण्यात आली आहे.

भारतामधील 14 मुख्य अब्जावधीनी जवळपास 4 लाख कोटी रुपये गमावावे लागले आहेत. अंबानी पहिल्या 20 च्या यादीत जगात होते परंतु त्याचे नाव आता त्या यादीमधून बाहेर पडले आहे. भारती शेअर बाजाराती मागील तीन महिन्यात अंबानीना 52 लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे. 31 डिसेंबर 2019 रोजी हा आकडा 155.53 इतका होता. तर 23 मार्च 2020 मध्ये हा आलेख 103 लाख कोटी रुपयावर स्थिरावला आहे.

Related posts: