|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर शंभर प्रवासी अडकले

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर शंभर प्रवासी अडकले 

प्रतिनिधी/ मडगाव

गोवा पाहण्यासाठी गोव्यात आलेले सुमारे शंभर प्रवासी मडगाव कोंकण रेल्वे स्थानकावर अडकून पडले आहेत. सद्या रेलगाडय़ा पूर्णपणे बंद असल्याने, त्यांना माघारी जाणे कठीण होऊन बसले आहे. त्याच्या निवाऱयाची सोय केली नसल्याने तसेच खाण्यापिण्याची व्यवस्था होत नसल्याने हे सर्व जण प्रचंड अडचणीत सापडले आहेत.

गोव्यात आलेले हे पर्यटक देशी असून ते गोव्यात आल्यानंतर रेलगाडय़ा तसेच बस गाडय़ा बंद करण्यात आल्याने, त्यांना माघारी फिरणे शक्य झाले नाही. सद्या ते उघडय़ावरच फिरत असून त्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली नाही. सद्या उघडय़ावर भटकणाऱयांना रात्रीच्यावेळी पोलीस पिटाळून लावतात, त्यामुळे कुठे आश्रय घ्यायचा असा सवाल त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, काल मडगाव पालिकेचे नगरसेवक अविनाश शिरोडकर यांनी त्यांना खाद्य पदार्थ पुरविण्याची व्यवस्था केली तसेच वैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अशा भटक्या लोकांसाठी निवारा व खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची लवकर पूर्तता करावी अशी मागणी होत आहे.

Related posts: