|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणेत तिसऱया दिवशीही बाजारपेठ बंद

पेडणेत तिसऱया दिवशीही बाजारपेठ बंद 

पेडणे  (प्रतिनिधी )    पेडणे बाजारपेठे   मंगळवारी  24 रोजी सकाळी पासून  कोरोना व्हायरासचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पेडणेतील  व्यावासायिक यांनी बंद  ठेवण्यात आली. पेडणे बाजारपेठ मंगळवारी मेडिकल दुकाने वगळता सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.

  पेडणे बाजारपेठ ही  पूर्णपणे बंद ठेवण्यात  आली. पेडणे बाजारपेठेतील  हा?टेल , कपडय़ांची दुकाने, इतर आस्थापने ही सर्व  सकाळपासून बंद ठेवण्यात  आली.   पेडणे बसस्थानकावर शुकशुकाट होता.

मासळी मार्केटही बंद ठेवण्यात आले होते. कोरोनाची धास्ती संपूर्ण जगाने घेतली आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने आणि त्यात अनेकांचे बळी गेल्याने या रोगाचा प्रादुर्भाव आणखीन वाढू  नये यासाठी यासाठी लोकांनी बाहेर फिरण्याचे टाळले.

ड़ पेडणे बाजारपेठत ठेवण्यात आला पोलीस बंदोबस्त

पेडणे पोलिस सकाळपासून पेडणे बाजारपेठ तैनात होते. दुजाकीवरुन सेच चारचाक्मया गाडीतून नागरिक कामानिमित्त फिरत होताना दृष्टीस पडत होते.

ड़ पेडणे बाजारपेठेतील  दोन औषध दुकाने उघडी होती. या दुकानावार नागरिक औषधे खरेदी करण्यासाठी आले. आजारी रुग्णांना औषधाचा कुठल्याही प्रकारे  तुटवडा वाटू नये यासाठी औषधालय उडे ठेवण्यात आल्याचे मालक विश्वनाथ तिरोडकर यांनी सांगितले .

 ड़ पेडणे बस स्थानकावर एकही वाहन आले नाही.

पेडणे बसस्थानकावर सकाळपासून एकही वाहन आले नाही.

ड़ सकाळी काही मोजकिच दुकाने उघडण्यात आली.

पेडणे बाजारपेठेतील किराणा  माल विक्री करणाऱया तीन दुकानदारानी दुकाने उघडून सकाळी 11 पर्यंत ग्राहकांना किरणा दिला.माञ 11 नंतर पोलिसांनी हि दुकाने बंद करण्यास सांगितले .

Related posts: