|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » लॉकडाऊनमुळे वीजमागणी 2500 मेगावॉटने घटली

लॉकडाऊनमुळे वीजमागणी 2500 मेगावॉटने घटली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील वीजमागणी तब्बल 2500 मेगावॉटने घटली आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा, खासगी ऑफिसेस, औद्योगिक-व्यापारी उलाढाल थांबल्याने मागील चार दिवसांत विजेची मागणी 2500 मेगावॉटने घटली आहे. 17 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रातील विजेची मागणी 21 हजार 112 मेगावॉट होती. ती 19 मार्चला 19 हजार 912 मेगावॉटपर्यंत खाली आली. म्हणजेच 1200 मेगावॉटने वीज मागणी कमी झाली. त्यानंतरच्या तीन-चार दिवसांत आता राज्यातील वीजमागणी 17 हजार 390 मेगावॉटपर्यंत घसरली.

दरम्यान, मंगळवारी रात्री 12 नंतर संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे कोटय़वधी लोक घरातच असतील. त्यांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने मनुष्यबळ व तात्रिक गोष्टींसाठी नियोजन आराखडा तयार केला आहे.

 

Related posts: