|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » चीनमधील हुबेई प्रांतातील बंदी आज उठवणार

चीनमधील हुबेई प्रांतातील बंदी आज उठवणार 

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन महिन्यांपासून बंद असलेल्या चीनमधील हुबेई प्रांतातील प्रवासबंदी आज उठवण्यात येणार आहे. तर वुहानमधील संपूर्ण बंदी 8 एप्रिलला उठवण्यात येणार आहे.

चीनमधील वुहान शहर आणि हुबेई प्रांत कोरोना विषाणूचे प्रमुख केंद्र होते. तेथूनच कोरोना विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाली आणि हळूहळू त्याने संपूर्ण जग व्यापले. वुहान ही हुबेई प्रांताची राजधानी असून या राज्याची लोकसंख्या ५.६ कोटी आहे. तेथून पसरणाऱया कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तेथील लोकांना सामूहिक पातळीवर विलगीकरणात ठेवण्यात आले होते. 23 जानेवारीपासून तेथे लोकांच्या हालचाली व सर्व व्यवहार यावर बंदी घालण्यात आली होती. आजपासून तिथे ग्रीन हेल्थ कोड लागू करण्यात येत आहे. त्यामुळे हुबेईच्या इतर भागातील लोक प्रवास करू शकणार आहेत. वुहानमधील संपूर्ण बंदी 8 एप्रिलला उठवण्यात येणार आहे.

चीनमध्ये गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे वुहानमधील कठोर निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती हुबेईच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Related posts: