|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » देशातील प्रवासी रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद

देशातील प्रवासी रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील लॉकडाऊनमुळे रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी देशातील प्रवासी रेल्वेसेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मात्र, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रेल्वे प्रशासनानेही रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रवासी वाहतूक बंद असली, तरी देशातील मालगाडय़ा सुरू राहणार आहेत. पॅसेंजर गाडय़ा बंद असल्यामुळे ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकीटे बुक केलेली आहेत. त्यांनी ती रद्द करू नये. रेल्वे प्रशासनाकडून त्यांना त्यांच्या तिकिटाचे पैसे परत करण्यात येणार आहेत, असेही रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

Related posts: