|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारा : नागठाण्यात प्रवाशांना नो एन्ट्री, परगावाहून आलेल्याना प्रथम दवाखान्याची सैर

सातारा : नागठाण्यात प्रवाशांना नो एन्ट्री, परगावाहून आलेल्याना प्रथम दवाखान्याची सैर 

प्रतिनिधी/नागठाणे

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरासह गावागावात खबरदारी घेतली जात आहे. मुंबई पुण्याहून मोठ्या प्रमाणात लोक गावाकडे येऊ लागल्याने सातारा तालुक्यातील नागठाणे ग्रामपंचायतीकडून मुख्य रस्त्यात गावात येणार्‍या वाहनांची तपासणी करून त्यांना नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणी साठी पाठविण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत.

गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनीटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.ग्रामपंचायतीकडून गावात सतत जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे.

Related posts: