|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » देशातील 48 कोरोनामुक्तांना रुग्णालयातून डिस्चार्ज

देशातील 48 कोरोनामुक्तांना रुग्णालयातून डिस्चार्ज 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एकीकडे वाढत असली, तरी देशातील विविध भागात कोरोनावर उपचार घेणाऱ्या 48 रुग्णांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याची दिवशी सर्वांना आनंदाची बातमी मिळाली आहे.

भारतात आतापर्यंत 550 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे, तर 11 जणांचा बळी गेला आहे. कोरोनावर ठोस औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना सपोर्टीव्ह औषधे देण्यात येतात. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता देशातील कोरोनाचे 48 रुग्ण बरे झाल्याने नागरिकांमधील चिंता कमी होणार आहे. सोमवारपर्यंत 35 रुग्णांना हॉस्पटिलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर मंगळवारी आणि बुधवारी सकाळपर्यंत 13 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तसेच कालपासून देशात कोरोनाच्या संसर्गाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसत आहे. सरकारच्या आवाहनाला लोकांना अधिक प्रमाणात प्रतिसाद दिल्यास नक्कीच स्थिती आटोक्यात आणता येईल, असे तज्ञ्जांचे म्हणणे आहे.

 

Related posts: