|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रुग्णांची अवस्था ‘ना घर का… ना घाट का’

रुग्णांची अवस्था ‘ना घर का… ना घाट का’ 

नागठाणे / प्रतिनिधी

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर नागठाणे (ता.सातारा) परिसरातील गावांमधून सुरु असलेल्या ‘लाॅक डाउन’ परिस्थितीचा फटका ग्रामीण भागातील रूग्णांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. नागठाणे परिसरातील ग्रामीण भागातील बहुतांश दवाखाने बंद, तर साताऱ्यात जायला प्रवेशबंदी यामुळे बहुतेक रुग्णांची अवस्था ‘ना घर का, न घाट का’ अशी बनली आहे.

सध्या सर्वत्र संचारबंदीची परिस्थिती आहे. ग्रामीण भागातही त्याचे पालन होताना दिसते. अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्वच ठिकाणी शासनाच्या आदेशाचे पालन काटेकोरपणे सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. अशा स्थितीत अत्यावश्यक सेवेचा घटक असलेले दवाखाने मात्र ग्रामीण भागात बंद स्थितीत आढळत आहेत.

या दवाखान्यांच्या दारांवर कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी असोसिएशनतर्फे खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचे बाह्यरुग्ण विभाग पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तरी होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगीर आहोत, अशी सूचना चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या आजारांच्या रुग्णांची कुचंबणा होताना दिसते. रुग्णाला सातारा येथील दवाखान्यात घेऊन जायचे ते प्रवेशबंदी आहे. सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिवराज पेट्रोल पंप परिसरात तसेच बोगदा परिसरात ग्रामीण भागातून येणारी वाहने अडविण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांसमोर नवीच समस्या उभी राहात आहे.

Related posts: