|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अबुधाबी, कॅलिफोर्नियातून आलेल्या तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह

अबुधाबी, कॅलिफोर्नियातून आलेल्या तिघांचा रिपोर्ट निगेटिव्ह 

प्रतिनिधी / सातारा

अबुधाबी आणि कॅलिफोर्नियातून साताऱ्यात आलेल्या तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अबुधाबी येथून प्रवास करुन आलेला 28 वर्षीय युवक व 39 वर्षीय पुरुष आणि कॅलिफोर्निया येथून आलेली 51 वर्षीय महिला असे एकूण तिघांना काल दि. 24 रोजी अनुमानित म्हणून शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले होते.

तिघांच्याही घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे एन.आय.व्ही. कडे पाठविण्यात आले होते. त्या तिघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आमोद गडीकर यांनी दिली आहे.

Related posts: