|Saturday, March 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. वैभव नाईक यांनी मालवण रुग्णालयाचा घेतला आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आ. वैभव नाईक यांनी मालवण रुग्णालयाचा घेतला आढावा 

प्रतिनिधी / मालवण

कोरोना व्हायसरच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण ग्रामीण रुग्णालयात आज भेट देऊन आरोग्य यंत्रणेमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच औषध पुरवठ्या बाबत आढावा घेत बाहेर गावातून आलेल्या लोकांची तपासणी करण्याच्या व इतर आवश्यक सूचना अधिकाऱ्यांना आ.वैभव नाईक यांनी केल्या.
तसेच जनतेला गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले.अशीच गर्दी होत राहिल्यास नाईलाजाने प्रशासनाला संपूर्णतः बंद करावे लागेल.त्यामुळे कोणीही घराबाहेर पडू नका स्वतःची काळजी घेउन पुढचे काही दिवस घरात थांबून प्रशासनाला सहकार्य करा असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.आज गुढीपाडवा सण असूनही देशात आलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना आरोग्य अधिकारी, कर्मचारी , पोलीस प्रशासन करत असून आमदार वैभव नाईक यांनी श्रीखंड व पुरणपोळ्या देऊन आरोग्य कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मालवण तहसीलदार अजय पाटणे, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर,पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, मालवण न.पं. मुख्याधिकारी श्री. जावडेकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, नगराध्यक्ष महेश कंदळगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी पाटील, तपस्वी मयेकर, आतू फर्नांडिस आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: