|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » कोरोनामुळे चोरांची कोंडी; सावज सापडेना…

कोरोनामुळे चोरांची कोंडी; सावज सापडेना… 

 ऑनलाईन टीम / पुणे : 

कोरोनामुळे शहरातील गुन्हेगारीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. प्रामुख्याने रस्त्यावरील वाटमारी, चेन स्नॅचिंग आणी बसमधील चोऱया बंदच झाल्या आहेत.

पुणे शहरात वाटमारी (स्ट्रीट क्राईम) मोठय़ा प्रमाणात होत असते. रस्त्यावरुन चालणाऱयांचे मोबाईल हिसकावणे, सोन साखळी हिसकावणे, धारदार शस्त्राचा धाक दाखवून किमती ऐवज हिसकावणे, दारूच्या नशेत मारहाण करणे आदी गुन्हे घडतात. रात्रीबरोबर दिवसाही असे गुन्हे शहराच्या विविध भागात घडताना दिसतात. सरासरी दररोज दोन ते तीन गुन्हयांची नोंद शहरातील विविध पोलीस ठाण्यात होत असते. पोलिसांनी नियमित नाकाबंदी, गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करुनही असे प्रकार कमी होताना दिसत नाहीत. मात्र कोरोनामुळे मागील आठवडाभरात रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वर्दळ नसल्याने गुन्हेगारांना सावज आढळत नाही. तर पीएमपी बस रिकाम्या धावत असल्याने गर्दी करुन महिलांची मंगळसूत्रे, पर्समधील किमती ऐवज आणि हातातील बांगडय़ा चोरणाऱया टोळय़ांनाही सावज मिळेनासी झाली आहेत.

 

Related posts: