|Saturday, March 28, 2020
You are here: Home » leadingnews » जगभरातील कोरोना बळींची संख्या 21,200 वर

जगभरातील कोरोना बळींची संख्या 21,200 वर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली  :

जगभरात हाहाकार माजवणाऱया कोरोना विषाणूने आतापर्यंत 21 हजार 200 जणांचा बळी घेतला आहे. तर आतापर्यंत 4 लाख 68 हजार 900 जणांना याची बाधा झाली आहे. जगभरातील 181 देशांमधील ही आकडेवारी आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच देश आपापल्या पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहेत. चीनमध्ये आता कोरोनाचा फैलाव कमी होताना दिसत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मागरिट हॅरिस म्हणाल्या, कोरोना विषाणूने आता संपूर्ण जग वेठीस धरले आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाचे 21 हजार 200 बळी गेले आहेत. तर 4 लाख 68 हजार 905 जणांना याची लागण झाली आहे. त्यामधील 1 लाख 14 हजार 200 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.

इटलीमध्ये कोरोना बळींची संख्या सर्वाधिक आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 7503 जण दगावले आहेत. तर 74 हजार 300 लोकांना बाधा झाली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे अमेरिका या साथीचे नवे केंद्र बनण्याची शक्मयता आहे.

भारतातील बळी 13 वर

भारतातील बळींची संख्याही आता 13 वर पोहचली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतात आणखी तीन बळी गेले. तमिळनाडू, मध्य प्रदेश व गुजरातमधील प्रत्येकी एका रुग्णाचा यात समावेश आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 606 वर पोहचली आहे.

 

Related posts: