|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » हातावर पोट असणाऱयांना पारलेकडून बिस्कीटवाटप

हातावर पोट असणाऱयांना पारलेकडून बिस्कीटवाटप 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केले असून, हातावर पोट असणाऱया गरजूंची गैरसोय लक्षात घेऊन पारले जी कंपनी तीन कोटी बिस्कीट पुडय़ांचे वाटप करणार आहे.

याबद्दल बोलताना पारले जी कंपनीचे प्रवर्ग प्रमुख मयांक शाह म्हणाले, आम्ही सरकारबरोबर काम करायचे ठरवले आहे. आम्ही सरकारच्या मदतीने गरजूंना पुढील तीन आठवडय़ात तीन कोटी बिस्कीट पुडे देणार आहोत.

सध्या लोकांना अन्नधान्याची गरज आहे. हातावर पोट असणारी मंडळी उपाशी राहू नयेत, यासाठी आम्ही सरकारसोबत काम करणार आहोत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

 

Related posts: