|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » मालेगाव शासकीय रुग्णालयात एमआयएम आमदाराचा राडा

मालेगाव शासकीय रुग्णालयात एमआयएम आमदाराचा राडा 

ऑनलाईन टीम / नाशिक :

संचारबंदीच्या काळात मालेगावातील शासकीय रुग्णालयात एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. ईस्माईल यांच्यासह त्यांच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्याशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. बुधवारी रात्री ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगावातील शासकीय रुग्णालयात दोन कोरोना संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत. या रुग्णालयात पुरेसा औषधसाठाही आहे. बुधवारी रात्री आमदार मौलाना मुफ्ती यांनी रुग्णालयातील डॉ. किशोर डांगे यांना रुग्णांच्या चौकशीसाठी फोन केला होता. मात्र, डांगे यांनी फोन न उचलल्याने मुफ्ती यांनी रुग्णालयात येऊन कामकाजात हस्तक्षेप केला. तसेच त्यांच्यासोबतचे 20 ते 25 कार्यकर्ते थेट डॉ. किशोर डांगे यांच्या दालनात शिरले. तेथे त्यांनी आरडाओरड करत डॉक्टरांशी हुज्जत घालत त्यांना धक्काबुक्की केली. त्यामुळे रुग्णालयात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

 

Related posts: