|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » संचारबंदीत लग्नसोहळा; दोन पोलीस निलंबित

संचारबंदीत लग्नसोहळा; दोन पोलीस निलंबित 

ऑनलाईन टीम / औरंगाबाद :

 संचारबंदीच्या काळात औरंगाबादेतील सावंगी हर्सूल येथील एका मंगल कार्यालयात लग्न सोहळा पार पडल्याप्रकरणी सावंगी बीटचे जमादार प्रशांत अशोक नावंदे व गोपनीय शाखेचे जमादार नंदकिशोर संपत दांडगे यांचे निलंबन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ही कारवाई केली.

 जमावबंदी आदेश लागू असताना  सावंगीत लग्न सोहळा पार पडला. याची माहिती फुलंब्री पोलीस ठाण्याचे नावंदे व दांडगे यांनी वरिष्ठांना देऊन कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र, त्यात कुचाराई केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर वधू पिता प्रल्हाद साळवे, वर पिता व मंगल कार्यालय मालक सुखदेव उत्तमराव रोडे या तिघांविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related posts: