|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » इस्लामपूरच्या काही रूग्णांची प्रकृती स्थिर : जयंत पाटील

इस्लामपूरच्या काही रूग्णांची प्रकृती स्थिर : जयंत पाटील 

प्रतिनिधी / इस्लामपूर

सांगलीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना हॉस्टेलमध्ये क्वॉरनटाईन केले आहे. काही रुग्णांशी माझं बोलणं झालं. रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती जलसंपदा मंञी जयंत पाटील यांनी सांगितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी नागरिकांनी करायला हवी. भाजी मंडई सारख्या परिसरात लोक जास्त गर्दी करतात तर अशा परिसरात रकाने बनवून त्यात उभे राहून खरेदी करावी, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच कोरोनाचा जास्त फैलाव होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असेही ते म्हणाले.

Related posts: