|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » शेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार

शेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार 

ऑनलाईन टीम / मुंबई

शेअर बाजारासाठी आज दुसऱ्या दिवशीही चांगली बातमी आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आज २८ हजार ७८२ अंकांवर सुरुवात झाली. त्यानंतर ६०० अंकांची उसळी घेत सेन्सेक २९ हजार १३७ वर पोहोचला. तर निफ्टीतही सुधारणा झाली असून ३२३ अंकांच्या तेजीसह ८ हजार ६४१ वर पोहोचला आहे.

बुधवारी चिंताजनक अवस्थेत सुरू झालेला शेअर बाजार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्यानंतर वधारला. दुपारनंतर सेन्सेकने १८६१ अंकांची उसळी घेत २८ हजार ५३५ अंकांवर बंद झाला होता. जागतिक बाजारात तेजी असल्याने त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटमध्येही दिसत आहे. अमेरिकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी २ लाख कोटी डॉलरचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेजी आहे.

Related posts: