|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे निधन

बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पूजा के फुल, आकाशदीप, लव्ह अँड गॉड, मेरे मेहबूब, बरसात, दीदार, दाग, उडन खटोला यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.

निम्मी यांचे नाव नवाब बानो होते. ते नाव राज कपूर यांनी बदलून निम्मी असे ठेवले. निम्मी यांचा जन्म आग्ऱयामध्ये झाला. त्यांचे वडील मूळचे मेरठचे होते. त्यांच्या आई वहिदन यांनीही चित्रपट क्षेत्रात मोठे नाव कमावले होते.

 

Related posts: