|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » कोरोना : कोल्हापुरात नागरिकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सअ‍ॅप क्रमांक सुविधा

कोरोना : कोल्हापुरात नागरिकांच्या तक्रारीसाठी व्हाट्सअ‍ॅप क्रमांक सुविधा 

प्रतिनिधी/कोल्हापूर

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने योग्यती खबरदारी घेतली जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना वेळच्या वेळी योग्य त्या सुचना देण्यात येत आहे. तर पुढेचे पाऊल म्हणून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांच्या समस्यातक्रारीसाठी व्हाट्सअ‍ॅप क्रमांक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाकडून 5 व्हाट्सअ‍ॅप क्रमांक प्रसिध्द करण्यात आले आहेत. हे क्रमांक 24 तास आणि सातही दिवस कार्यरत असतील. 93 56 71 65 63, 93 56 73 27 28, 93 56 71 33 30, 93 56 75 00 39, 93 56 71 63 00 या व्हाट्सअ‍ॅप क्रमाकांवर नागरिकांनी आपल्या समस्यांबाबत संदेश पाठवावेत. हा संदेश खाली दिलेल्या स्वरूपात असावा.

*नाव* –
*मोबाईल नं.* –
*तक्रारीचे स्वरूप* –

मात्र खोटी माहिती अफवा पसरविणारे संदेश या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष संपर्कासाठी 1077 आणि 0231- 2659232 हे क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध आहेत*

महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी दोन हेल्पलाईन व्हाट्सअ‍ॅप नंबर सुरु करण्यात आलेले आहेत. यावर कोरोना संदर्भातील ज्या काही तक्रारी, अडचणी, सूचना असतील त्या 9766532010 9766532016 या नंबरवर द्याव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

Related posts: