|Saturday, March 28, 2020
You are here: Home » solapur » स्वत:बरोबरच कुटुंबीयांची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा : वळसे-पाटील

स्वत:बरोबरच कुटुंबीयांची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा : वळसे-पाटील 

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा. स्वतःबरोबरच कुटुंबियांची काळजी घ्या. घरातच थांबून आरोग्य विभागाच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे भावनिक आवाहन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी  सोलापूरच्या नागरिकांना केले आहे.

पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अतिशय चोख उपाययोजना केली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, पोलीस, जिल्हा परिषद, महापालिका, अन्नधान्य वितरण कार्यालय अशा सर्व  विभागाचे अधिकारी /कर्मचारी अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती मदत केली आहे. अडचणी, समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मी दररोज जिल्हा प्रशासनाशी संपर्क ठेऊन आहे.

नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळावेत, असे आवाहन करुन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे की, इतरांच्या संपर्कात येण्याचे टाळा, स्वच्छता पाळा, शिंकताना, खोकतांना नाका-तोंडावर रुमाल धरा. वारंवार साबणाने हात धुवा, जागरुक रहा, घाबरुन जाऊ नका, काळजी घ्या.

Related posts: