|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » कोल्हापुरात सापडला पहिला कोरोनाग्रस्त

कोल्हापुरात सापडला पहिला कोरोनाग्रस्त 

प्रतिनिधी / कोल्हापूर

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता कोल्हापुरातही कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला असून इस्लामपूर येथील कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. पेठ वडगाव येथील महिलेचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, इस्लामपूरातील एकाच कुटुंबातील ९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या कुटुंबातील चौघेजण हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते. याच कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याने पेठ वडगाव येथील महिलेसह चौघांना मिरज येथील रुग्णालयात दाखल केले होते. यातील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून उपचार सुरू आहेत.

Related posts: